अमेरिकी नागरिकांमध्ये युरोपी देशांत स्थलांतरित होण्याच्या प्रमाणात वाढ

सध्या अमेरिकी नागरिक मोठ्या प्रमाणात इटली, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीस, फ्रान्स यांसारख्या युरोपीय देशांत स्थायिक होत आहेत. या देशांतील त्यांची संख्या आता ४५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो !  

शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांवर संशोधन केल्यावर शाळेत जातांना शालेय मार्गावर अधिक रहदारी असल्याने मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते, तसेच ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो, असे आढळून आले.  

‘एफ्.बी.आय.’ने माझी ३ पारपत्रे चोरली ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

ट्रम्प यांच्या प्रशस्त ‘पाम हाऊस’ आणि ‘मार-ए-लोगो’ येथे ‘एफ्.बी.आय.’ने धाड टाकली होती. या वेळी अधिकार्‍यांनी कागदपत्रे जप्त केली होती.

ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांमध्ये नाझींच्या चिन्हावर बंदी

ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या २ राज्यांमध्ये नाझींच्या ‘हाकेनक्रूझ’ या चिन्हावर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !

चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !

आक्रमणात सलमान रश्दी यांचा मृत्यू न झाल्याने धर्मांध मुसलमानांना दु:ख !

न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्टच्या दिवशी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

बांगलादेशात हिंदु शिक्षकावर विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांकडून आक्रमण !

बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यात असलेल्या माणिकगंज शासकीय महाविद्यालयातील हिंदु प्राध्यापक रतन कुमार यांच्यावर सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘छात्र लीग’च्या नेत्यांनी आक्रमण केले.

जगातील सर्वांत प्राचीन नद्यांपैकी एक ३४६ कि.मी. लांबीच्या थेम्स नदीचा किनारा कोरडाठक्क पडण्याच्या मार्गावर !

ब्रिटनने त्यांच्या देशातील १४ पैकी ८ भाग दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. त्यात डेवोन, कॉर्नवाल, सॉलेंट, साऊथ टाऊ, केंट, दक्षिण लंडन, हर्ट्स, उत्तर लंडन, ईस्ट एंग्लिया, थेम्स, लिंकनशायर, नॉर्थम्प्टनशायर आणि मिडलँड्स या भागांचा समावेश आहे.

भारत श्रीलंकेला देणारा समुद्रावर लक्ष ठेवणारे ‘डोर्नियर’ विमान

एकीकडे श्रीलंकेने पाकची युद्धनौका आणि चीनची गुप्तहेर नौका यांना त्याच्या बंदरावर येण्यास अनुमती दिली असतांना दुसरीकडे भारताने श्रीलंकेला अशा प्रकारचे सैनिकी साहाय्य करणे किती योग्य आहे ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !

सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणात आमचा हात नाही ! – इराण

न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला एका कार्यक्रमात भारतीय वंशाचे मूळचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणात आमचा हात नाही, असा खुलासा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.