अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील संघटना पाकमधील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा निषेध करतात; मात्र भारतातील बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय रहातात !

पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा

येथील दलीपोरा परिसरात १६ मेच्या पहाटे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले, तर एक सैनिक हुतात्मा झाला. तसेच २ सैनिक घायाळही झाले. यानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

शोपियांमध्ये २ आतंकवादी ठार

येथील हिंदसीतापूर येथे सैनिकांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

आतंकवादी संघटनांना साहाय्य केल्याच्या कारणावरून पाककडून ११ संघटनांवर बंदी

पाक केवळ जगाला दाखवण्यासाठी अशी बंदी घालण्याचा दिखाऊपणा करत आहे. पाकला खरेच आतंकवाद नष्ट करायचा असता, तर त्याने प्रथम आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे बंद केले असते आणि सर्व आतंकवाद्यांना फाशी दिली असती !

बालाकोटवरील कारवाईत १७० आतंकवादी ठार ! – इटलीच्या महिला पत्रकाराचा दावा

असे कितीही पुरावे दिले, तरी पाक त्याला भीक घालणार नाही. त्यामुळे ‘आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना’ असलेल्या पाकचा निःपात करणे, हाच एकमेव उपाय होय !

पाककडून होणाऱ्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘सिंधू जल करार’ मोडू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चेतावणी

गेल्या ५ वर्षांत पाकने अनेक आतंकवादी आक्रमणे करूनही भाजपने हा करार का मोडला नाही ? आता करार मोडण्यासाठी सरकार कशाची वाट पहात आहे ? अशा चेतावणीमुळे ‘पाक आतंकवादी कारवाया थांबवील’, अशी अपेक्षा कधीतरी करता येईल का ?

पाकिस्तानी तरुणींशी बनावट विवाह करून त्यांना चीनमध्ये नेऊन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या चिनी नागरिकांना अटक

पाकिस्तानी तरुणींशी बनावट विवाह करून नंतर त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडण्यात येणार्‍या एका टोळीचा शोध लागला आहे. या तरुणींशी विवाह करून त्यांना खोटे सांगून चीनमध्ये नेण्यात येत होते… या घटनेतून असे स्पष्ट होते की, पाक आता पूर्णपणे चीनच्या कह्यात गेला आहे !

पाककडून भारताच्या ४३ मासेमारांना अटक

पाक आणि श्रीलंका सातत्याने भारतीय मासेमारांना सागरी सीमा ओलांडली म्हणून अटक करत असतांना सरकार मासेमारांना सागरी सीमेविषयी योग्य मार्गदर्शन का करत नाही ?

मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमण पाकिस्तान आणि तत्कालीन काँग्रेस सरकार यांच्या संगनमताने झाले ! – माजी केंद्रीय गृहसचिव मणी यांचा दावा

गेली काही वर्षे हे सूत्र ते वारंवार उपस्थित करत आहेत; मात्र त्याची नोंद भाजप सरकारने तात्काळ घेतली नाही. हिंदूंनो, तुम्हाला ‘आतंकवादी’ ठरवू पहाणार्‍या संबंधित सर्व हिंदुद्वेष्ट्यांना कायद्याने शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसू नका !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now