भारताची चीन आणि पाक यांना चेतावणी : ‘सीपीईसी’ प्रकल्प भारताच्या भूमीत, काम त्वरित थांबवा !

लोकहो, चीन आणि पाकिस्तान यांनी आपली सहस्रावधी एकर भूमी बळकावूनही स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी ती परत घेण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, हे सत्य जाणा ! आता हे केवळ हिंदु राष्ट्रातच शक्य होईल !

ऊसउत्पादकांचा प्रश्न न सोडवल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू !

शेतकर्‍यांना अशी चेतावणी द्यावी लागणे अपेक्षित नाही !

हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांची पाने फेसबूककडून बंद करण्यात आली आहेत.

गलवानमधील संघर्षानंतर गेल्या वर्षभरात ४३ टक्के भारतियांनी चिनी वस्तूंकडे फिरवली पाठ ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

४३ टक्के लोकांनी पाठ फिरवली असली, तरी ५७ टक्के लोकांनी चिनी वस्तू घेतली असणार, हे यातून लक्षात येते आणि ही संख्या अधिक आहे ! लोकांमध्ये अजूनही देशप्रेम जागृत करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !

नव्या ‘रोस्टर’च्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठातील अधिवक्त्यांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार !

असोसिएशनचे म्हणणे आहे की, सरन्यायाधिशांनी ‘रोस्टर’ परत घेण्यासाठी समितीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. यामुळे अधिवक्ते संतप्त आहेत.

गुंडेवाडी (जिल्हा सातारा) येथे सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार ! – शरद निकम, सरपंच

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रहित करून मराठा समाजावर अन्याय केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकत असून कोणत्याही नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही.

वसीम रिझवी यांना इस्लाममधून बहिष्कृत करण्याची धर्मांधांची मागणी !

जातीपातींमुळे एखाद्याला बहिष्कृत केल्याची घटना एखाद्या खेडेगावात घडली, तर लगेच पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी संघटना तेथे धावून जातात आणि त्याचा विरोध करतात; मात्र अशा घटनांविषयी ते आणि भारतीय प्रसारमाध्यमे सोयीस्कर मौन बाळगतात !

गेल्या ८ मासांत चिनी वस्तूंच्या खरेदीत ३ टक्क्यांची वाढ !

यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील तो सुदिन !

भारत पुन्हा चिनी आस्थापनांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्याची शक्यता

चीन विश्‍वासघातकी देश असल्याने त्याच्याशी अधिकाधिक कठोर होऊन त्याच्यावर दबाव निर्माण करण्यासह त्याच्या सर्वच वस्तूंवर बंदी घालण्याची आवश्यकता असतांना जर अशी मान्यता दिली जात असेल, तर तो आत्मघाती निर्णय ठरेल !

केवळ क्षमा नाही, तर सर्वांना कारागृहात टाकणार ! – आमदार राम कदम, भाजप

‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.