पाकमधील भ्रष्टाचारात वाढ ! – सर्वेक्षण

भ्रष्टाचार, आतंकवाद, अल्पसंख्याकांवरील अत्याचार, धर्मांतर आदी सर्वच गोष्टींमध्ये पाकिस्तान आघाडीवर असतांना त्याच्यावर जगाने बहिष्कारच घातला पाहिजे !

देशात ४४ टक्के मानसिक रुग्ण उपचारांसाठी बाबा, तांत्रिक आणि हकीम यांचे साहाय्य घेतात ! – सर्वेक्षणातील निष्कर्ष

यावरून ‘विज्ञानाने आजार बरे होतात, यावर ४४ टक्के रुग्णांचा विश्‍वास नाही’, हे सिद्ध होते आणि त्यातून विज्ञानाची मर्यादा लक्षात येते.

पाकिस्तानकडून २ सहस्र ३१७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून २ सहस्र ३१७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे तर सैनिकांनी १४७ आतंकवाद्यांना ठार केले आहे.

४ सहस्र ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध, तर ७९८ उमेदवारांचे अर्ज असंमत

विधानसभा निवडणुकीसाठी ५ सहस्र ५४३ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ४ सहस्र ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ७९८ उमेदवारांच्या अर्जात त्रुटी असल्याने ते असंमत झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

भारत-पाक यांच्यात अणूयुद्ध झाल्यास १२ कोटी ५० लाख लोक ठार होतील ! – संशोधकांचा दावा

जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणूयुद्ध झाले, तर सुमारे १२ कोटी ५० लाख लोक ठार होतील, तसेच जगात याचा अन्नधान्यांवर परिणाम होऊ शकतो, असे संशोधकांच्या एका अभ्यासातून समोर आले आहे.

देशभरातील उपनगरीय रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेत मुंबईतील अंधेरी स्थानकाचा प्रथम क्रमांक

रेल्वे मंत्रालयाने देशभरातील महत्त्वाच्या ४०७ मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेविषयी एका त्रयस्थ आस्थापनाद्वारे केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील पश्‍चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला.

औषधांना दाद न देणार्‍या क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ

औषधांना दाद न देणार्‍या (डीआर्) क्षयरोग रुग्णांची संख्या देशात ५० टक्क्यांनी वाढली असल्याचे केंद्रीय क्षयरोग अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातील २० टक्के रुग्णांना उपचार मिळू शकलेले नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF