सातारा बसस्थानकातील वाहनतळ सुविधा चालू करण्याची मागणी !

बसस्थानक परिसरामध्ये प्रशासनाकडून वाहनतळाच्या प्रारंभी लावण्यात आलेला ‘नो पार्किंग’चा फलक

सातारा, ३० मार्च (वार्ता.) – येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये असलेली वाहनतळ सुविधा चालू करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये वाहनतळाची कोणतीही व्यवस्था नाही. सातारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था चालू करण्यात आली होती; मात्र काही अडचणींमुळे या ठिकाणी ‘नो-पार्किंग’चे (वाहने न लावण्याचे) फलक लावण्यात आले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये वाहनांचे आरक्षण करणे, पार्सल पाठवण्यासाठी येणे, नातेवाइकांना सोडण्यासाठी, तसेच भेटण्यासाठी नागरिक येत असतात. बसस्थानकासमोरच खासगी वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहे; मात्र थोड्या वेळासाठी ही सुविधा नागरिक घेत नाहीत. कायमस्वरूपी सुसज्ज वाहनतळाची उपायोजना करावी, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिक करत आहेत.