पुन्हा नक्षलवादी आक्रमण !

नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.

चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’

पँगाँग सरोवराच्या ठिकाणी भारताने कोणताही प्रदेश गमावलेला नाही !- सैन्यदलप्रमुख नरवणे यांची स्पष्टोक्ती

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सुरक्षा धोका अन् युद्धाची शक्यता याविषयी सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.

पाकचे षड्यंत्र !

‘पाकने भारताशी व्यापार करावा किंवा नाही’ या सूत्राचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही; परंतु पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मात्र चीन, पाकचे सैन्य यांसह कुणाकुणाचा दबाव आहे आणि ‘निर्णय घेणे’ हे त्यांच्या हातात नाही, हेच यातून सिद्ध होत आहे. यामुळे परत एकदा त्यांची मान खाली गेली आहे.

तिरुपती मंदिरात दान केल्या जाणार्‍या केसांची चीनमध्ये होणार्‍या तस्करीमागे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसमधील नेत्यांचा सहभाग !

आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस हा ख्रिस्तीधार्जिणा पक्ष असल्याने अशी घटना हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिराच्या संदर्भात घडत असेल, तरी केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य उघडकीस आणले पाहिजे.

काश्मीरमधील स्थिती सामान्य, तर चीनमध्ये उघूर मुसलमानांवर अत्याचार चालूच !

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकाराविषयी सादर केलेल्या अहवालामध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये मात्र उघूर मुसलमानांवर अत्याचार होत आहेत.

(म्हणे) ‘भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये होणार्‍या चर्चेविषयी आनंदच !’ – चीन

चीनला आनंद होणारच; कारण अशा चर्चेतून काहीही साध्य होणार नाही आणि पाक भारतात आतंकवादी कारवाया चालूच ठेवणार, हे चीनला ठाऊक आहे !

भारतासाठी चीन एक आव्हानात्मक शेजारी देश ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारताने हे आव्हान स्वीकारून चीनवर मात केली पाहिजे. त्या दिशेने भारताचे प्रयत्न असले पाहिजेत !

चीनच्या अणूबॉम्ब डागणार्‍या लढाऊ विमानांची तैवानच्या सीमेमध्ये घुसखोरी !

चीन छोट्याशा तैवानवर कशा प्रकारे दबाव निर्माण करत आहे, हे यातून लक्षात येते. चीनचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यापासून भारतालाही धोका आहे. त्याला रोखायचे असेल, तर भारताने आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक !  

भारताने चीनच्या कर्ज देणार्‍या २७ अ‍ॅप्सवर घातली बंदी !

वास्तविक सरकारने एवढे होईपर्यंत वाट न पहाता चिनी अ‍ॅप्सवर तात्काळ बंदी घालणे अपेक्षित होते !