पुणे – गुटखा तस्करी करणारा आरोपी निजामुद्दीन महेबुब शेख याला राजगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलिसांच्या तपास पथकाने पुणे- सातारा रस्त्यावर २८ मे २०२३ या दिवशी कारवाई करत गुटख्याचा ट्रक पकडला होता. या कारवाईत ४१ लाख १३ सहस्र किंमतीचा गुटखा आणि १० लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला होता. हा गुटखा असणारा ट्रक खेड शिवापूर पोलीस चौकीसमोरून पहाटेच्या वेळी निजामुद्दीन शेख याने चोरून नेला. ट्रकमधील गुटखा काढून ट्रक पोलीस ठाण्यापासून ४ कि.मी. अंतरावर सोडून पसार झाला. हा गुटखा पोलिसांनी आरोपी निखील नहार याच्या गोदामावर धाड घालून पकडला. त्या वेळी गुटख्याचा पुरवठा निजामुद्दीन शेखकडून होत असल्याचे त्याने चौकशीत मान्य केले. निजामुद्दीन हा येरवडा, खडक आणि काळेपडळ ठाण्यांतर्गत आरोपी आहे. आरोपीची चौकशी चालू असून त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात असल्याचे राजगडचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)