कोरोनामुळे एस्.टी. महामंडळातील सहा कर्मचार्‍यांचा मृत्यू

ठाणे विभागात ८४ कर्मचारी कोरोनाबाधित असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागात ६९ जण कोरोनाबाधित असून एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एस्.टी. महामंडळाने दिली.

कोरोनाच्या संसर्गामुळे फेरीवाल्यांना व्यवसायासाठी अनुमती नाही ! – राज्य सरकार

राज्य सरकारने फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अनुमती द्यावी, याविषयी सरकारला निर्देश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकारने अशी भूमिका उच्च न्यायालयात मांडली.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यात यश मिळवले आहे ! – राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या, तसेच बरे झालेले रुग्ण, यांचा विचार करता येथील जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यात यश मिळवले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, पणन राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी केले.

पुणे महापालिका क्षेत्रातील ३० हून अधिक रुग्णालये मनुष्यबळाअभावी बंद

महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या अनेक पदे रिक्त असल्याने मनुष्यबळाअभावी महापालिका क्षेत्रातील ३० हून अधिक रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात १५० डॉक्टरांची भरती करणार आहे, असे पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबळे यांनी सांगितले.

पुढील आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’द्वारे उपचार करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा शासन पुढील आठवड्यापासून सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’द्वारे उपचार करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २५०

जिल्ह्यात ८ जुलै या दिवशी आणखी ५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या कारोनाबाधित रुग्णांची संख्या २५० झाली आहे.

माण (जिल्हा पुणे) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने ८ दिवस कडकडीत बंद

हिंजवडी माण या भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून माण ग्रामपंचायतीने ९ ते १६ जुलै या काळात कडकडीत बंद घोषित केला आहे.

महाराष्ट्रात समूह संसर्गाचा धोका नाही ! – सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आय.सी.एम्.आर्.च्या) वतीने राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये केलेल्या सेरो सर्वेक्षणात (रक्तचाचणी) कोरोनाबाधितांचे प्रमाण केवळ १.१३ टक्के आढळले आहे. परिणामी समूह संसर्गाचा धोका नसल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

खासगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी करण्यासाठी आधुनिक वैद्यांच्या चिठ्ठीची आवश्कयता नाही ! – मुंबई महानगरपालिका

कोरोनाची लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आता खासगी प्रयोगशाळेत थेट कोरोनाची चाचणी करून घेता येणार आहे.

कोरोनाची लस ३ मासांत येणार ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

भारतात कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. ६ ते ७ आठवड्यांत या प्रयत्नांना यश येणार आहे, असा दावा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.