पुणे शहरातील खासगी रुग्णालयांच्या लाभासाठी ‘डायलिसिस’च्या दरात ५० टक्के वाढीची शिफारस !

शहरातील खासगी रुग्णालयातील ‘शहरी गरीब योजने’तील ‘डायलिसिस’चे दर ५० टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस महापालिकेच्या समितीने केली आहे.

डॉक्टर कुणाचाही मृत्यू केवळ आजचा उद्यावर ढकलत असतो, अगदी त्याचा स्वतःचाही !

लक्षात असू दे की, डॉक्टर कुणाचाही मृत्यू केवळ आजचा उद्यावर ढकलत असतो, अगदी त्याचा स्वतःचाही ! आयुष्याच्या रेषेची लांबी कशी वाढेल आणि तो प्रवास वेदनारहित कसा होईल ? ते खरा डॉक्टर बघत असतो.

संपादकीय : सेवावृत्ती गमावलेली रुग्णालये !  

सरकारकडून आर्थिक लाभ मिळवून त्याचा लाभ रुग्णांना न देणार्‍या रुग्णालयांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

गोव्यात प्रतिदिन एक रुग्णाचा कर्करोगाने होतो मृत्यू

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वर्ष २०२४ मध्ये कर्करोगामुळे ४०४ रुग्णांचा मृत्यू झाला. यानुसार प्रतिदिन कर्करोगाने ग्रासलेल्या एका रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण आहे.

Govt Announces “Cashless Treatment” : रस्ते अपघातातील घायाळांवर विनामूल्य उपचार ; सरकार दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च उचलणार !

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना या महिन्यापासून, म्हणजेच मार्च २०२५ पासून दीड लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळतील. खासगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल.

‘कार्डियाक अरेस्‍ट’ झालेल्‍या रुग्‍णांसाठी ‘कोल्‍स – कॉम्‍प्रेशन ओन्‍ली लाइफ सपोर्ट’ ही ‘कार्डियाक रिसस्‌सिटेशन’ची (‘हृदय-पुनरुज्‍जीवन तंत्रा’ची) प्रक्रिया म्‍हणजे एक संजीवनी !

जोपर्यंत रुग्‍णाचा श्‍वास आणि हालचाल चालू होत नाही, तोपर्यंत, तसेच पुढील वैद्यकीय सुविधा मिळण्‍यासाठी रुग्‍णालयात हस्‍तांतरण करीपर्यंत छातीदाबन चालू ठेवणे आवश्‍यक आहे.

Nurse Use Fevikwik Instead Of Stitches : ७ वर्षांच्या मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी परिचारिकेने लावले फेविक्विक  !

हानगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही घटना घडली. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यावर राज्य सचिवांनी तिला निलंबित केले.

Mahakumbh Ayurvedic Treatment : प्रतिदिन ८०० हून अधिक रुग्णांवर नि:शुल्क आयुर्वेदिक उपचार !

महाकुंभपर्वात येणार्‍या कोट्यवधी भाविकांना आजारावर उपचार मिळावेत, यासाठी १० आयुर्वेद चिकित्सालय उभारण्यात आले आहेत. प्रत्येक चिकित्सालयात ३ वैद्यांसह अन्य ६ कर्मचारी कार्यरत आहेत. एका चिकित्सायलयात प्रतिदिन ८०० हून अधिक रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात येत आहेत.

पुणे शहरातील ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांचा वैद्यकीय व्यय महापालिका उचलणार !

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (‘जी.बी.एस्.’च्या) रुग्णांच्या उपचारांचा व्यय ५ लाख रुपयांपेक्षा अधिक होत आहे. राज्य सरकारच्या ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’तून या आजारांवर उपचार होत आहेत.

पुण्यात जी.बी.एस्.च्या रुग्णसंख्येत वाढ !

गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जी.बी.एस्.) रुग्णांची पुण्यातील एकूण संख्या ७० वर पोचली आहे. त्यांतील १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात अन्यत्रही जी.बी.एस्.चे ३ रुग्ण आढळून आले आहेत.