
पुणे – घरावर करणी केल्याचे सांगून नीळकंठ सूर्यवंशी याने एका महिलेचे साडेतीन तोळे सोने चोरले. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे. पीडित महिलेच्या पतीला मद्याचे व्यसन होते. २ वर्षांपूर्वी सूर्यवंशी याच्या सांगण्यावरून महिलेच्या पतीने मद्य पिणे सोडले. त्यामुळे त्याच्यावर महिलेचा विश्वास होता. सूर्यवंशीने २७ मार्च या दिवशी पीडितेला सांगितले की, घरावर करणी केली आहे. ती काढून देतो, असे सांगून घरातील सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. बोलण्यात गुंतवून सोने घेऊन सूर्यवंशी पसार झाला.