धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा ! – आमदार नीलेश राणे, शिवसेना

न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ध्वनीप्रदूषणाविषयी नियमावली निश्चित केली आहे. असे असतांना ‘अजान’ (मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे) देतांना याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येते.

११ ते १६ डिसेंबरपर्यंत मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर बंद !

मंदिर प्रशासनाकडून मूळ मूर्तीच्‍या समोर प्रतिकृती सिद्ध करण्‍यात आली आहे. तिचे दर्शन पुढील ५ दिवस भाविक घेऊ शकतात. माघी गणेशोत्‍सव १ फेब्रुवारी २०२५ या दिवशी होणार आहे.

कोल्‍हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्‍वर मंदिराच्‍या भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढा ! – भाजप

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलचे नियोजन पालटले; प्रवाशांचा गोंधळ !; बेस्‍टच्‍या चाकात अडकून मृत्‍यू !….

ठाण्‍याहून सुटणार्‍या सायंकाळी ७.४५ च्‍या बदलापूर रेल्‍वेच्‍या ऐवजी मुंबई दिशेकडे जाणारी सायंकाळी ७.३५ ची गाडी लावल्‍याने प्रवाशांचा गोंधळ झाला.

पुणे शहरातील २ लाख २० सहस्रांहून अधिक मिळकतींची ४० टक्‍के करसवलत रहित !

महापालिकेने वर्ष १९७० पासून एका निवासी मिळकतीवर ४० टक्‍के कर सवलत देण्‍यास प्रारंभ केला होता.

जैन साधकांसारखी वस्‍त्रे परिधान करून मंदिरात चोरी करणारा चोर कह्यात !

जैन साधकांसारखी वस्‍त्रे परिधान करून मंदिरात सोन्‍याचे दागिने चोरणार्‍या चोराला स्‍वारगेट पोलिसांनी कह्यात घेतले. सॅलिसबरी पार्क भागात चोरी करतांना त्‍याचे सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले होते.

इचलकरंजी (कोल्‍हापूर) येथे जप्‍तीची कारवाई टाळण्‍यासाठी लाच घेतांना कायदेशीर सल्लागारास अटक !

लोकहो, लाच मागणार्‍यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करून भ्रष्‍टाचाराला आळा घाला !

हिंदु शौर्यदिनानिमित्त ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांचे आक्रमण !

हिंदूबहुल महाराष्ट्रातील हिंदू आणखी किती काळ अशी आक्रमणे झेलत रहाणार आहेत ? सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

सांगलीत कॉपीमुक्‍त बोर्ड परीक्षेसाठी सभा

इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे आणि परीक्षा कॉपीमुक्‍त अन् गैरप्रकार मुक्‍त करण्‍यासाठी कोल्‍हापूर विभागीय मंडळाने शाळाप्रमुखांच्‍या बैठकांचे आयोजन केले आहे.