श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हे नोंद !
वर्ष २०१४-१५ दरम्यान सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून साखर तारण ठेवून ६१ कोटी रुपये कर्ज घेतल्यानंतर तारण साखरेची परस्पर विक्री करून बँकेची ४६ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरूद्ध १० वर्षांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.