कोलकातामधून इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना अटक

कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेच्या महंमद जियाऊर रहमान, ममूर राशिद, महंमद सहीन, रोबिइल इस्लाम या ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे.

काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या ५ आतंकवाद्यांना अटक

येथे पोलिसांनी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा प्रयत्न उधळून लावत हिजबुल मुजाहिदीनच्या ५ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून ‘आयईडी’ स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.

हिजबुल मुजाहिदीनकडून जम्मू  येथील ‘एकजूट जम्मू’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा यांना ठार मारण्याचे षड्यंत्र

येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘एकजूट जम्मू’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.

हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या काश्मीरमधील १३ संपत्ती जप्त

पाकमध्ये रहाणारा जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या जम्मू-काश्मीरमधील १३ संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जप्त केली आहे.

जम्मू बसस्थानकावर ग्रेनेडद्वारे केलेल्या आक्रमणात १ जण ठार, ३२ घायाळ

सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक यांद्वारे उरी अन् पुलवामा आक्रमणाचा सूड उगवल्याचे सांगणारे भाजप सरकार या आक्रमणाचा सूड उगवणार कि पुन्हा मोठ्या आक्रमणाची ते वाट पहात रहाणार ?

या आक्रमणाचा सूड कधी घेणार ?

जम्मू येथील बसस्थानकावर दुपारी १२ च्या सुमारास आतंकवाद्यांनी केलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात उत्तराखंड येथील युवक महंमद शारिक याचा मृत्यू झाला, तर ३२ जण घायाळ झाले.

(म्हणे) ‘बुरहान वानी याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते !’ – मेहबूबा मुफ्ती यांचे देशद्रोही विधान

हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी मारला गेला; पण त्याचे (देशद्रोही आणि विखारी) विचार आजही काश्मीर खोर्‍यात जिवंत आहेत. त्यामुळे त्याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले.

काश्मीरमधील किश्तवाडमध्ये आतंकवादी रियाज अहमद यास अटक

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करणारा ‘हिजबुल मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी रियाज अहमद यास पोलिसांनी अटक केली. आतंकवादी संघटनांमध्ये काश्मिरी तरुणांची करत होता भरती !

पंचायतींच्या निवडणुका लढवल्या, तर डोळ्यांमध्ये अ‍ॅसिड फेकू ! – हिजबुल मुजाहिदीनची काश्मिरी नागरिकांना धमकी

पंचायतींच्या निवडणुका लढवल्या, तर डोळ्यांमध्ये अ‍ॅसिड फेकू, अशी धमकी हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेने काश्मिरी नागरिकांना दिली.


Multi Language |Offline reading | PDF