केंद्र सरकारने बोलावली काश्मीर खोर्‍यातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक !

कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक !

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

काँग्रेसेचे नेते दिग्विजय सिंह यांनी पाकच्या पत्रकाराला कलम ३७० रहित करण्याचे आश्‍वासन दिल्याचे प्रकरण
दिग्विजय सिंह यांना त्यांच्या काश्मिरी हिंदू असलेल्या भावजयेकडून घरचा अहेर !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा, तर ३ नागरिक ठार !

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !

(म्हणे) ‘भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर कलम ३७० वर पुनर्विचार करू !’

काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्‍वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !

जम्मू-काश्मीरमध्ये श्री व्यंकटेश्‍वराच्या मंदिराचा रविवारी भूमीपूजन सोहळा !

१७ एकर भूमीत होणार मंदिर, वैदिक पाठशाळा, यात्रेकरूंसाठी सुविधा, कर्मचारी संकुल !
कलम ३७० रहित झाल्यानंतर पहिल्या मंदिराची उभारणी !

शोपियामध्ये आतंकवाद्यांनी ठार होण्यापूर्वी मशिदीला आग लावल्याचा प्रयत्न केल्याचे उघड !

९ एप्रिल या दिवशी सुरक्षादलांनी ५ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले. हे आतंकवादी येथील एका मशिदीमध्ये लपले होते. या आतंकवाद्यांनी मशिदीच्या एका भागाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता, असे आता समोर आले आहे.

पाकचे षड्यंत्र !

‘पाकने भारताशी व्यापार करावा किंवा नाही’ या सूत्राचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही; परंतु पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मात्र चीन, पाकचे सैन्य यांसह कुणाकुणाचा दबाव आहे आणि ‘निर्णय घेणे’ हे त्यांच्या हातात नाही, हेच यातून सिद्ध होत आहे. यामुळे परत एकदा त्यांची मान खाली गेली आहे.

काश्मीरमधील स्थिती सामान्य, तर चीनमध्ये उघूर मुसलमानांवर अत्याचार चालूच !

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकाराविषयी सादर केलेल्या अहवालामध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये मात्र उघूर मुसलमानांवर अत्याचार होत आहेत.

अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !

जम्मू-काश्मीरमधील सरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा नायब राज्यपालांचा आदेश

जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांवर येत्या १५ दिवसांत राष्ट्रध्वज फडकावण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० असतांना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज फडकावण्यात येत असे; मात्र कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्यात आले.