मुख्यमंत्र्यांचे आदेश न्यायालयाकडून रहित !
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित धान्यवाटप घोटाळा आणि गाळे विक्रीत १ कोटी १६ लाख रुपयांच्या आर्थिक हानी प्रकरणी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रहित ठरवले आहेत. याविषयी ‘पणनमंत्र्यांनी पुन्हा सुनावणी घ्यावी’, असे आदेशही न्यायालयाने २४ ऑगस्ट या दिवशी दिले आहेत.