२ संशयितांना अटक
बीड – मुसलमानांचा रमझान मास चालू असतांना येथील अर्धामसला गावात २९ मार्चच्या रात्री अडीच वाजता मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मशिदीची काही प्रमाणात हानी झाली. या स्फोटाची माहिती गावच्या माजी सरपंचांनी तात्काळ पोलिसांनी दिली. स्फोट घडल्यानंतर अवघ्या ३- ४ घंट्यांत पोलिसांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या २ संशयितांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे.
१. उरूसच्या मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ज्या वेळी स्फोट घडवण्यात आला, तेव्हा आरोपी मद्याच्या नशेत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
२. आरोपींनी मशिदीत जिलेटीन कांड्यांचा वापर करून हा स्फोट घडवला आहे. आरोपींना जिलेटीनच्या कांड्या कुठून मिळाल्या, त्याचा शोध चालू आहे.
विहिरीच्या खोदकामासाठीचे जिलेटीन वापरल्याची प्राथमिक माहिती
अटक करण्यात आलेले दोन्ही तरुण विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे हे शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे. ते माथेफिरू असल्याचेही सांगितले जात आहे. स्फोटासाठी वापरण्यात आलेले जिलेटिन विहिरीच्या खोदकामासाठीचे होते, अशी प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना आणि दोन्ही समाजाला शांतात राखण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, झालेला प्रकार निंदनीय आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस तत्पर आहेत. लोकांना आवाहन आहे की, तुम्ही शांतता ठेवा. एका व्यक्तीने असे केले म्हणजे राज्य अशांत केले पाहिजे, असे नाही. आज आणि उद्या सण आहे. सर्वांनी शांत रहावे.
संपादकीय भूमिकाऐन रमझानच्या कालावधीत मशिदीत बाँबस्फोट होतो, यामागे जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करण्याचा काही भाग नाही ना ?, याचीही चौकशी पोलिसांनी करणे आवश्यक आहे ! |