बीड जिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप !

जिल्हा रुग्णालयात प्रसूतीच्या वेळी महिलेचा मृत्यू झाला आहे. सौ. छाया गणेश पांचाळ असे मृत महिलेचे नाव आहे. आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. सुश्रुत घैसास यांना पाठवली नोटीस !

डॉ. सुश्रुत घैसास यांना वैद्यकीय उपचारांतील निष्काळजीपणा झाल्यामुळे नोटीस बजावली आहे आणि उत्तर देण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी दिला आहे.

डॉक्टर कुणाचाही मृत्यू केवळ आजचा उद्यावर ढकलत असतो, अगदी त्याचा स्वतःचाही !

लक्षात असू दे की, डॉक्टर कुणाचाही मृत्यू केवळ आजचा उद्यावर ढकलत असतो, अगदी त्याचा स्वतःचाही ! आयुष्याच्या रेषेची लांबी कशी वाढेल आणि तो प्रवास वेदनारहित कसा होईल ? ते खरा डॉक्टर बघत असतो.

संपादकीय : सेवावृत्ती गमावलेली रुग्णालये !  

सरकारकडून आर्थिक लाभ मिळवून त्याचा लाभ रुग्णांना न देणार्‍या रुग्णालयांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा निधी वापरलाच नाही !

या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींहून अधिक निधीचा उपयोग केला नसल्याचा ठपका धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.

धर्मादाय रुग्णालयांनी ‘धर्मादाय’ नावाचा फलक दर्शनी भागात लावावा ! – महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती

वास्तविक हा नियम आहे. त्यामुळे पुन्हा सूचना देण्यापेक्षा जी धर्मादाय रुग्णालये याचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

पुणे शहरांतील रुग्णालयांनी अनामत रक्कम घेऊ नये !

रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची, तसेच वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास १८००२३३४१५१ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंत्रीमंडळाकडे अहवाल सादर !

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आगाऊ रक्कम न भरल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे महिलेला उपचारासाठी अन्य रुग्णालयात नेण्यात आले.

प्राथमिक अहवालानुसार गर्भवती मातेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी !

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा परवाना रहित करून प्रशासनावर गुन्हे नोंद करावेत !

सांगली येथे मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने !