(म्हणे) ‘भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही, तर दक्षिण गोलार्धात उतरले ! – चीन

चीनला भारताची प्रगती पाहून पोटदुखी झाल्याने तो अशा प्रकारची टीका करत आहे, हेच लक्षात येते !

चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला.

परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता !

यापूर्वी चीनच्या सैन्याच्या ‘रॉकेट फोर्स’चे प्रमुखही बेपत्ता झाले होते.

‘जी-२०’ परिषदेविषयी चीनकडून भारताची स्तुती : अमेरिकेवर टीका !

भारत आर्थिक सुधारणा आणि बहुपक्षीय मुत्सद्देगिरी यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो; परंतु अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांना हे नको आहे. हे देश रशिया-युक्रेन युद्धाला अधिक महत्त्व देत आहेत. पाश्चात्त्य देशांनी सतत भारत-चीन संघर्षाला खतपाणी घातले आहे.

(म्हणे) ‘भारताने स्‍वतःला हवे ते म्‍हणावे; मात्र ‘भारत व्‍यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा मोठा प्रश्‍न !’ – ‘ग्‍लोबल टाइम्‍स’

भारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये !

(म्हणे) ‘भारतासमवेतचे संबंध स्थिर !’ – चीन

चीनच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? चीनची बोलणे आणि करणे यात नेहमीच भेद राहिलेला आहे !

चीनच्या खालावत चाललेल्या अर्थव्यवस्थेला शी जिनपिंग यांची फसलेली धोरणे कारणीभूत !

शी जिनपिंग त्यांचे विस्तारवादी धोरण, तसेच छोट्या आणि गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याच्या धोरणामुळेही चीनची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे.

चीनचा ‘युतु-२’ रोव्हर ४ वर्षांनंतरही चंद्रावर सक्रीय !

प्रज्ञान रोव्हर चंद्रावर एकटा नाही. चीनचा ‘युतु-२’ नावाचा रोव्हरदेखील चंद्रावर असून तो ४ वर्षांनंतरही अद्याप सक्रीय आहे.

चीनच्या आर्थिक मंदीचा संपूर्ण जगाला बसणार फटका !

आर्थिक मंदीच्या चीनवरील टांगत्या तलवारीचा परिणाम संपूर्ण जगावरच होणार आहे. जगातील दुसर्‍या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या या चिंताजनक स्थितीमुळे जागतिक स्तरावर मंदीची लाट येईल अशी भीती आहे.