शेतकर्‍यांची किफायतशीर रक्कम कारखान्यांनी थकवली ! – राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी

पुणे – ऊस उत्पादकांना उसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम एकरकमी द्यावी, असा न्यायालयाचा आदेश आहे; मात्र त्यानंतरही कारखान्यांनी ही रक्कम थकवली आहे. या रकमेवर शेतकर्‍यांना व्याज देणे बंधनकारक करावे, या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तालयात साखर आयुक्त सिद्धराम सलीमथ यांची भेट घेतली. राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि संवेदनशील विषय उपस्थित करून लोकांना भडकवण्याचे काम करून सरकार त्यांचे अपयश लपवत आहे. शेतकर्‍यांची ७ सहस्र कोटी रुपयांची किफायतशीर रक्कम कारखान्यांनी थकवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यकर्ते आमच्या समवेत औरंगजेबापेक्षाही वाईट वागतात, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.