पुढील ४ ते ६ मासांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होणार ! – बिल गेट्स यांची चेतावणी

बिल गेट्स यांची चेतावणी

नवी देहली – पुढील ४ ते ६ मासांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट होऊ शकते. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड एवेल्यूएशनच्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये कोरोनामुळे २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो.

मास्क लावण्यासारख्या इतर नियमांचे पालन केल्यास मृत्यूचा हा आकडा अल्प होऊ शकतो, अशी चेतावणी ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी दिली आहे.

गेट्स यांची ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ ही संस्था कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी सध्या काम करत आहे.