
पुणे – बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात ठिकठिकाणी अग्नीशमन उपकरणे लावली आहेत. या उपकरणांमध्ये २० जुलै २०२३ या दिवशी आग विझवणारी रसायने भरली होती. त्यांची मुदत १९ जुलै २०२४ या दिवशी संपली. परिणामी ही उपकरणे आग विझवण्यासाठी उपयोगी नाहीत. याविषयी वैद्यकीय उपाध्यक्ष आधुनिक वैद्य सोमनाथ खेडकर यांनी सांगितले की, उपकरणामध्ये रसायने भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील अग्नीशमन उपकरणामध्ये रसायने भरण्यात आली आहेत; परंतु बी.जे. महाविद्यालयील उपकरणातील रसायने भरली नाहीत. त्यासाठी पाठपुरावा चालू आहे, तसेच ससूनचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य एकनाथ पवार यांनी अग्नीशमन उपकरणाऐवजी खासगी आस्थापनाच्या सामाजिक दायित्व निधीतून फायरबॉल बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिका
|