गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या प्रसाराला आरंभ !

सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव यांनिमित्त…

रामनाथी (गोवा), ३० मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव यांनिमित्त १७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा राज्यात भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे. या महोत्सवाच्या प्रचाराला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून आरंभ करण्यात आला.

आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी लावण्यात आलेल्या महोत्सवाच्या फलकाचे उद्घाटन ३० मार्च या दिवशी करण्यात आले. बांदिवडे गावाचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक यांनी श्रीफळ वाढवून या फलकाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी फलकाचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्यासह साधकही उपस्थित होते. या महोत्सवात देशभरातून मान्यवरांसह साधक सहभागी होणार आहेत.