अनंतनागमध्ये २ आतंकवादी ठार

येथे सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

सातारा येथे पुलवामा आक्रमणातील हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली

१४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी पुलवामा येथे आतंकवादी आक्रमण झाले. त्यात अनेक भारतीय सैनिक हुतात्मा झालेे. आक्रमणाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त १४ फेब्रुवारी या दिवशी हुतात्मा सैनिकांना येथील शिवतीर्थावर श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुलवामा आक्रमणाच्या आतंकवाद्यांचा हिशेब चुकता करण्यात आला आहे ! – सी.आर्.पी.एफ्.चे विशेष महासंचालक

पुलवामा आक्रमणाच्या काही मासानंतर हे षड्यंत्र रचणार्‍यांचा शोध घेण्यात आला आणि त्यांचा हिशोब चुकता करण्यात आला आहे. तसेच आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (‘सी.आर्.पी.एफ्’चे) विशेष महासंचालक (जम्मू-काश्मीर झोन) झुल्फिकार हसन यांनी केले.

नगर येथे सैन्याचा बॉम्ब निकामी करतांना स्फोट होऊन स्थानिकाचा मृत्यू

जिल्ह्यातील खारेकर्जुने येथे सैन्याचा सापडलेला बॉम्ब निकामी करतांना त्याचा स्फोट होऊन यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना के.के. रेंज हद्दीत माळरानावर घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

पाकच्या सैन्याने मशिदीवर केलेल्या गोळीबारात १ जण ठार, तर ४ जण घायाळ

पाकच्या सैन्याने १४ फेब्रुवारी या दिवशी सीमेवर भारतीय गावांना लक्ष्य करत गोळीबार केला. यातील शाहपूर गावातील एका मशिदीवर झालेल्या आक्रमणात १ जण ठार, तर ४ जण घायाळ झाले.

नक्षलवाद्यांसमवेतच्या चकमकीत २ कमांडो हुतात्मा, तर १ नक्षलवादी ठार

येथील इरापल्ली येथे १० फेब्रुवारीला सकाळी कोब्रा बटालियनचे कमांडो आणि नक्षलवादी यांच्या झालेल्या चकमकीमध्ये १ नक्षलवादी ठार झाला, तर २ कमांडो हुतात्मा झाले. तसेच ४ कमांडो घायाळ झाले. कोब्रा बटालियनचे कमांडो शोधमोहीम राबवत असतांना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.

भारताकडून इराणसारखी चूक होणार नाही ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

भारतातील ‘एअर डिफेन्स कमांड’मुळे भारताकडून इराणसारखी चूक कधीही होऊ शकणार नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले आहे.

पाकच्या गोळीबाराला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ४  सैनिक ठार

पाकने गोळीबार करायचा आणि नंतर भारताने प्रत्युत्तर द्यायचे, हे आणखी किती दिवस चालणार ? त्यापेक्षा ‘पाक’ नावाची डोकेदुखी कायमची दूर केली पाहिजे !

मुंबई पर हुआ २६/११ का आतंकी आक्रमण कांग्रेस और पाक सेना का षड्यंत्र ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

केंद्र सरकार इसकी जांच करे और सत्य सामने लाए !