भाषण करतांना काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने कानशिलात लगावली !

‘कोणी एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे केल्यास समोरच्या व्यक्तीचे मनपरिवर्तन होते’, असे मोहनदास गांधी यांनी म्हटले होते; अहिंसावादी काँग्रेसचे कार्यकर्ते ही शिकवण विसरले आणि त्यांनी मारणार्‍या व्यक्तीला अमानुष मारहाण केली, यातून काँग्रेस किती ढोंगी आणि हिंसाचारी आहे, हे स्पष्ट होते !

हरिद्वारसहित २४ रेल्वेस्थानकांवर आक्रमण करण्याची लष्कर-ए-तोयबाची धमकी

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्याकडून घातपात करण्यापूर्वीच पाकमध्ये घुसून त्यांच्या आतंकवाद्यांना, प्रशिक्षण केंद्रांना भारताने नष्ट केले पाहिजे ! भारतियांनी अशा धमक्यांच्या छायेखाली आणखी किती वर्षे जगायचे आहे ?

जिहादी आतंकवाद्यांकडून आता काश्मीरमध्ये चिनी ग्रेनेडचा वापर

पाकिस्तान काश्मीरमधील आतंकवाद्यांना चिनी ग्रेेनेड पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत सुरक्षादलांनी आतंकवाद्यांकडून ७० चिनी ग्रेनेड जप्त केले आहेत.

अहिंसावादी काँग्रेसची अमानुषता जाणा !

गुजरातमध्ये एका प्रचारसभेत भाषण करतांना काँग्रेसचे उमेदवार हार्दिक पटेल यांना तरुण गुर्जर नावाच्या व्यक्तीने कानशिलात लगावली.

पठाणकोट (पंजाब) येथे पाकिस्तानी नागरिकाची भारतीय सीमेत घुसखोरी करून भारतियाला मारहाण

पाकच्या या कुरापतींच्या विरोधात भाजप सरकार काय कृती करणार आहे ? काँग्रेसच्या राज्यात पाकचे सैनिक भारतात घुसून भारतीय सैनिकांना ठार करून त्यांचे शिर कापून घेऊन गेले होते, तशी घटना नागरिकांच्या संदर्भात घडण्याची सरकार वाट पहाणार आहे का ?

जैश-ए-महंमदकडून नियंत्रणरेषेवर पुन्हा आतंकवाद्यांसाठीचे ‘लॉन्चिंग पॅड’ सक्रीय

एखाद्या एअर किंवा सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवाद नष्ट होत नाही, हेच ही घटना दर्शवते ! यासाठीच आतंकवादाचा पूर्ण निःपात करण्यासाठी आरपारची कारवाई केली पाहिजे !

जम्मू-श्रीनगर महामार्गावर आतंकवादी आक्रमणाची शक्यता

जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुन्हा एकदा आतंकवादी आक्रमणाची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. श्रीनगरमधील बटवारा आणि टॅट्टू ग्राऊंड परिसर हा अतीसंवेदनशील असून याठिकाणी दुचाकीद्वारे बॉम्बस्फोट घडवण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

बालाकोट येथील एअर स्ट्राईकनंतर पाककडून भारतीय सीमेवर ५१३ वेळा गोळीबार

४ सैनिक हुतात्मा, तर ६ नागरिकांचा मृत्यू : ‘आता आतंकवाद सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी पाककडून गेल्या दीड मासात झालेला गोळीबार आणि त्यात सैनिकांना आलेले हौतात्म्य यांविषयी गप्प का आहेत ? पाकला कायमचा धडा मिळेल, असा प्रयत्न का केला जात नाही ?

गडचिरोलीत मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांकडून स्फोट

सर्वपक्षीय सरकारांनी नक्षलवाद्यांचा वेळीच बिमोड केला असता, तर आज ही वेळ आली नसती !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now