सिक्कीम सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी चोपले !

चीनच्या वाढत्या कुरापती पहाता चीनविरोधात भारताने थेट सैनिकी कारवाई करून अक्साई चीन आणि लडाख पुन्हा स्वतंत्र केला पाहिजे ! भारतीय सैन्याचे मनोबळही उंचावलेले असल्याने चीनला ते नक्कीच भारी पडतील, यात भारतियांना शंका नाही !

प्रजासत्ताकदिन : पूर्वी आणि आता 

पूर्वी हा प्रजासत्ताक सोहळा एक सण म्हणून साजरा केला जात असे. समाजातील प्रतिष्ठित, तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य नागरिकही त्यांच्या बालगोपाळांना घेऊन आनंदाने आणि जल्लोषाने या कार्यक्रमास उपस्थिती लावायचे.

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !

गरीब भारत !

मोगल आणि इंग्रज येण्यापूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, हे सत्य आहे आणि आताही तो निघू शकण्याची भारताची क्षमता आहे; मात्र आवश्यकता आहे ती धर्माधिष्ठित आणि जनतेला साधना शिकवणार्‍या शासनकर्त्यांची !

संजीवनी !

ब्राझिलच्या राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानतांना एक चित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. यात भारतातून श्री हनुमान हातात संजीवनी असलेला डोंगर घेऊन ब्राझिलमध्ये येत आहे, असे दर्शवले आहे.

ब्रिटनमधील खासदाराच्या तक्रारीनंतर ‘बीबीसी’ने जम्मू-काश्मीर वगळून दाखवलेले भारताचे मानचित्र मागे घेत केली क्षमायाचना !

भारताच्या चुकीच्या मानचित्राला ब्रिटनमधील खासदार विरोध करतो; मात्र भारत सरकार आणि भारतातील खासदार विरोध करत नाहीत, हे लज्जास्पद !

कंबोडियाकडूनही भारताकडे कोरोनावरील लसींची मागणी

भारतात कोरोनावरील स्वदेशी लस निर्माण केल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आता जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसींची मागणी केली आहे.

चीनला जशास तसे उत्तर द्या !

१९८० च्या दशकापासून चीन सतत भारतीय भूभागांवर नियंत्रण मिळवत आहे. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाला याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तापिर गाओ यांनी केला आहे.

(म्हणे) ‘मोदी सरकार संपूर्ण आशिया खंडाला संघर्षाच्या खाईत ढकलू शकते !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारत नाही, तर पाकने गेली ३ दशके दक्षिण आशिया खंडाला हिंसाचाराच्या गर्तेत ढकलेले आहे, ही वस्तूस्थिती आहे ! पाकचा नायनाट केल्याविना हे थांबणार नाही आणि ते मोदी सरकारने करावे, असेच भारतियांना वाटते !