गेल्या ११ मासांत काश्मीरमध्ये २११ आतंकवादी ठार : ४७ जणांना अटक

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट होऊ शकलेला नाही; कारण आतंकवादी ठार करण्यात आले, तरी पाकमध्ये त्यांची घाऊक निर्मिती चालू आहे. पाकमधून २०० ते ३०० आतंकवादी नेहमीच भारतात घुसखोरी करण्यास सिद्ध असतात, असे सांगण्यात येते. हे पहाता येथील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले पाहिजे !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षीच्या ११ मासांमध्ये सुरक्षादलांनी २११ आतंकवाद्यांना ठार केले, तर ४७ जणांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १५० जणांना अटक करण्यात आली आहे.

ठार करण्यात आलेल्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीनचे २ कामांडर रियाय नायकू आणि डॉ. सैफउल्ला, तर जैश-ए-महंमदचा काश्मीरमधील प्रमुख आतंकवादी कारी यासिर यांचा समावेश आहे. तसेच यात ५० पाकिस्तानी आतंकवादी होते. वर्ष २०१९ मध्ये ११ मासांमध्ये १५२ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते.