पुणे महानगरपालिकेसह ठेकेदाराला ५ लाख रुपयांचा दंड !

जलतरण तलावामध्ये ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे – महानगरपालिकेला जलतरण तलावामध्ये निष्काळजीपणामुळे ६ वर्षीय मुलाचा २ जून २०१८ या दिवशी मृत्यू झाला होता. या प्रकरणी महानगरपालिकेसह ठेकेदार, सुरक्षारक्षक यांना स्थायी लोकअदालतीने तक्रारदाराला यांना ५ लाख २५ सहस्र रुपये ६ टक्के व्याजासह तक्रार प्रविष्ट झाल्यापासून देण्याचे, तक्रारदाराला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी १ लाख रुपये अतिरिक्त देण्याचे आदेश दिले. ‘स्थायी लोकअदालती’चे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी आणि सदस्य शुभम फंड यांनी हे आदेश दिले.

महानगरपालिकेच्या मालकीचा जलतरण तलाव ‘बोपोडी कल्चरल अँड रिसर्च ॲकॅडमी’ ही खासगी संस्था चालवत होती.