मृत्यूदंडाच्या कार्यवाहीची आवश्यकता !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षेची कार्यवाही केल्याच्या चांगल्या परिणामांचे अन्य कोणते चांगले उदाहरण असू शकेल ? लोकशाहीवादी अमेरिकेने चांगला पायंडा पाडला आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेकडून बोध घेऊन मृत्यूदंड अथवा फाशीच्या शिक्षांची तात्काळ कार्यवाही करून जनतेचे सर्वंकष हित साध्य करावे !

अमेरिकेत गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या पोटातून बाळ काढणार्‍या महिलेला फाशी होणार

अमेरिकेत वर्ष २००४ मध्ये लिसा मॉन्टेगोमेरी या महिलेने एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचे पोट चिरून बाळ पळवले होते.

सिस्टर अभया हत्या प्रकरण आणि वासनांध पाद्रयांची दुष्कृत्ये !

एक स्पष्ट होते की, सत्य लपत नाही आणि दुष्कृत्ये करणारे दुर्जन हे सदा सर्वकाळ जनतेला फसवू शकत नाही. २८ वर्षांनंतरही सत्य समोर आले आणि ‘पाद्री वासनेसाठी हत्याही करू शकतात’, हे उघडकीस आले. त्यामुळेच न्यायालयावर १३० कोटी जनतेचा विश्‍वास अजूनही टिकून आहे.

वुहानचे वास्तव !

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे अन्य देशांतील आकडे लाखांच्या घरात जात असतांना चीनमध्ये केवळ काही सहस्र नागरिकांचीच माहिती होती. याचे कारण आता लक्षात येत आहे की, ज्यांनी ही माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची चीनने मुस्कटदाबी केली, त्यांचा छळ केला.

दरोडा प्रकरणातील कोलवाळ कारागृहातील कैद्याला त्याच्या साथीदारांनी रुग्णालयातून पळवून नेले

दरोडा घातल्याप्रकरणी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयातून त्याच्या २ साथीदारांनी पळवून नेण्याची घटना ३० डिसेंबरला घडली.

पाकमध्ये गेल्या ६ वर्षांत बलात्काराच्या २२ सहस्र घटना; मात्र शिक्षा केवळ ७७ जणांनाच !

पाक इस्लामी देश असतांनाही तेथे अशांना शरीयतनुसार शिक्षा देत नाहीत, हे लक्षात घ्या ! केवळ सोयीपुरती शरीयतची मागणी केली जाते. यातून धर्मांधांचे ढोंगी धर्मप्रेम उघड होते !

बांगलादेशात फाशी ठोठावलेल्या गुन्हेगाराला १० वर्षांनंतर देहलीत अटक !

बांगलादेशातील गुन्हेगार हे घुसखोरी करून भारतात येऊन लपून रहातात; मात्र भारतीय सुरक्षायंत्रणा आणि पोलीस झोपलेले असल्याने त्यांचे फावते, हेच यातून लक्षात येते ! घुसखोरांसह अशांवरही कारवाई आवश्यक !  

इतर देशांच्या तुलनेत प्रत्येक बातमीत भारत मागासलेला असल्याचे आणखी एक उदाहरण !

‘नायजेरियातील कदुना प्रांताच्या सरकारने बलात्कार्‍यांना शस्त्रकर्म करून नपुंसक बनवण्याचा कायदा संमत केला आहे, तसेच १४ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

जिहादी आतंकवादी हाफीज सईद याला आणखी १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हाफीज सईद याला यापूर्वीही शिक्षा झाली आहे; मात्र तो घरातच सर्व सुखे उपभोगत आहे. त्यामुळे त्याला अशा कितीही शिक्षा झाल्या तरी त्याच्यावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही . अशी शिक्षा म्हणजे पाकची जगाच्या डोळ्यातील धूळफेक आहे !

पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना जन्मठेपेची शिक्षा

राज्यातील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.