बांगलादेशात फाशी ठोठावलेल्या गुन्हेगाराला १० वर्षांनंतर देहलीत अटक !

बांगलादेशातील गुन्हेगार हे घुसखोरी करून भारतात येऊन लपून रहातात; मात्र भारतीय सुरक्षायंत्रणा आणि पोलीस झोपलेले असल्याने त्यांचे फावते, हेच यातून लक्षात येते ! घुसखोरांसह अशांवरही कारवाई आवश्यक ! 

हत्या प्रकरणात आरोपी असलेला बांगलादेशातील मासूम उपाख्य सरवर

वी देहली – देहली पोलिसांनी गेल्या १० वर्षांपासून भारतात लपून राहिलेल्या बांगलादेशातील मासूम उपाख्य सरवर या गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याला बांगलादेशाच्या न्यायालयाने अपहरण आणि हत्या यांप्रकरणी वर्ष २०१३ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

वर्ष २००५ मध्ये त्याने त्याच्या ५ सहकार्‍यांसह एका लहान मुलाचे अहपरण करून नंतर त्याची हत्या केली होती. या प्रकरणी अटक झाल्यावर त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर त्याने बांगलादेशातून पळ काढून भारतात घुसखोरी केली होती.