पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना जन्मठेपेची शिक्षा

सिस्टर अभया हत्या प्रकरण

सिस्टर अभया, पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

२२ डिसेंबरला न्यायालयाने त्यांना या हत्येच्या प्रकरणी २८ वर्षांनंतर दोषी ठरवले होते. या दोघांना ७ मार्च १९९२ च्या पहाटे सिस्टर अभया यांनी कोट्टयम् येथील कॉन्व्हेंटमधील स्वयंपाकघरात आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने त्यांनी तिला डोक्यावर आघात करून बेशुद्ध केले आणि नंतर विहिरात टाकून तिची हत्या केली होती. राजू नावाच्या एका चोराने दिलेल्या साक्षीमुळे या दोघांनी हत्या केल्याचे सिद्ध होऊ शकले. घटनेच्या वेळी तो येथे उपस्थित होता. न्यायालयाने त्याची साक्ष ग्राह्य धरली.