राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ११.४.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

बांगलादेशात जिहादी संघटनेच्या पदाधिकार्‍याला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.

बांगलादेशमध्ये गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत ! – अमेरिकेतील नेत्या तुलसी गबार्ड

क सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही….

नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता जाणा !

बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यानंतर बांगलादेशात आणखी एका मंदिरावर आक्रमण !

अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्‍या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.

बांग्लादेश में धर्मांधों ने राधा गोबिंद आश्रम को जलाया ! देवताओं की मूर्तियां भी जलाईं !

– इस्लामी देशों में हिन्दुओं की की दशा !

बांगलादेशातील हिंसाचारामागे बंदी घातलेली जिहादी संघटना जमात-ए-इस्लामीचा हात !

एखाद्या संघटनेवर बंदी घातली म्हणजे तिचे कार्य संपत नाहीत, हे लक्षात घेऊन अशा बंदी घातलेल्या संघटनांचा पूर्णपणे निःपात करणे आवश्यक ठरते !

बांगलादेशमध्ये राधागोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला !

‘बांगलादेशमध्ये आमचे राज्य आहे’, असेच यातून बांगलादेशातील धर्मांध हे भारताला आणि हिंदूंना दाखवून देत आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

मुसलमानेतर देशच आजपर्यंत मुसलमानांसाठी अधिक सुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्‍याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे झाली.