राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, केंद्र आणि राज्य शासन यांनी भूमिका स्पष्ट करावी ! – मुंबई उच्च न्यायालय

कोरेगाव भीमा दंगलीचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, केंद्र आणि राज्य शासन यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाकडून गुन्हा नोंद

व्हिडिओकॉन आस्थापनाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत  यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) गुन्हा नोंद केला आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

आदिवासी समाज ख्रिस्ती मिशनरी आणि सी.पी.एम्. यांच्या प्रभावाखाली काम करत आहे ! – विवेक विचार मंच  

खरे गुन्हेगार शोधून निर्दोष आदिवासींची तातडीने मुक्तता करावी, तसेच या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्या माध्यमातून करावे, अशी मागणी विवेक विचार मंचच्या वतीने संतोष जनाठे यांनी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत व्यावसायिक स्पर्धेमुळे नैराश्यात गेला होता का, याची चौकशी करण्यात येईल ! – गृहमंत्री अनिल देशमुख

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृत्यू गळफास लागल्यानेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे; मात्र तो ‘क्लिनिकल डिप्रेशन’मध्ये होता.

मिथेनॉल वापरून सॅनिटायझरची विक्री होत असल्याप्रकरणी दक्षता बाळगावी ! – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग

विदेशात सॅनिटायझरमध्ये मिथेनॉलचा वापर करून विक्री करणार्‍या गुन्हेगारांची आंतरराष्ट्रीय यंत्रणा कार्यरत आहे. याविषयी योग्य ती दक्षता बाळगावी, अशी चेतावणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) दिली आहे.

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या कार्यालयांवर सीबीआयच्या धाडी

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चा अवैध गोष्टींत सहभाग असल्याचे स्पष्ट ! हिंदूंच्या मानवाधिकाराविषयी जाणीवपूर्वक मौन बाळगून केवळ अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचारांविषयी ऊर बडवणार्‍या या तथाकथित मानवाधिकार संस्थेवर भारतात बंदीच घातली पाहिजे !