अमेरिकेत गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या पोटातून बाळ काढणार्‍या महिलेला फाशी होणार

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत वर्ष २००४ मध्ये लिसा मॉन्टेगोमेरी या महिलेने एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचे पोट चिरून बाळ पळवले होते. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिलेला सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची कार्यवाही करण्याला संमती दिली आहे.

लिसा हिला मृत्यूदंड देण्यात आला, तर अमेरिकेच्या गेल्या ७० वर्षांच्या इतिहासात मृत्यूदंडाची शिक्षा झालेली ती पहिली महिला बंदीवान ठरणार आहे. लिसा हिला डिसेंबर मासामध्येच मृत्यूदंड देण्यात येणार होता; मात्र तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याने तो स्थगित करण्यात आला होता.