सुशांतसिंह यांची (आत्म)हत्या ?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा ‘ती आत्महत्या आहे’, असेच वातावरण निर्माण केले गेले. ‘ते कसे निराशेत होते’, ‘गेल्या काही कालावधीत त्यांच्याकडून एक एक चित्रपट कसे काढून घेण्यात आले’, त्याची वर्णने रंगवण्यात आली.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचे अन्वेषण अद्याप केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे गेलेले नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे अन्वेषण करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. मुंबई पोलिसांकडून योग्य पद्धतीने अन्वेषण चालू आहे. अन्वेषण कुणी करायचे याविषयी ११ ऑगस्ट या दिवशी सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. अद्याप हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे गेलेले नाही

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवा !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन या दोघांच्याही आत्महत्येच्या चौकशीत हलगर्जीपणा करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करा आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. – भाजपचे आमदार अतुल भातखळकर

प्रसिद्धीमाध्यमांवरील खोट्या बातम्यांमुळे आमची अपकीर्ती !

प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी ओळख दडवून न सांगताच घरी धडकतात. मुलाखतीच्या नावाखाली मुंबई पोलीस आणि त्यांच्याकडून चालू असलेल्या चौकशीवर विश्‍वास आहे का ?, असे विविध प्रश्‍न विचारतात. यामुळे पोलिसांच्या अन्वेषणात बाधा येत आहे. दिशा हिच्या मृत्यूविषयी आमचा कुणावरही संशय नाही.

सोलापूर येथे शिकाऊ डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एका २४ वर्षीय शिकाऊ डॉक्टरने वसतीगृहातील त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे अन्वेषण सीबीआयकडे देण्याची बिहार सरकारची शिफारस

अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या अन्वेषणावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू असतांना आता बिहार सरकारने या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संचालकांचा इमारतीवरून पडून मृत्यू

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे संचालक कुलवेंद्र सिंह कपूर यांचा ते रहात असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सदनिकेतून पडून मृत्यू झाला आहे. ३१ जुलैला रात्री अनुमाने ९.३० वाजता ही घटना घडली.

पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दोषींना कारागृहात टाकल्याविना रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सुशांत सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांचे अन्वेषण योग्य दिशेने चालू आहे. याविषयी कुणाकडे ठोस पुरावे असतील, तर ते पोलिसांकडे द्यावेत. त्यामध्ये तथ्य आढळल्यास दोषींना कारागृहात टाकल्याविना रहाणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाली, असे मला वाटते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

मला असे का वाटत आहे की, सुशांतसिंह राजपूत यांची हत्या करण्यात आली आहे, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याविषयी २६ सूत्रे त्यांनी मांडली आहेत.

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येची चौकशी करण्यास मुंबई पोलीस सक्षम ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे दिले जाणार नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.