Allahabad HC Urges Media : श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणात चुकीचे वार्तांकन करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह यांच्यातील खटल्याची सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना वार्तांकन करण्यावरून चेतावणी दिली आहे. ‘न्यायालयीन कामकाजाचे दायित्वशून्यतेने  किंवा कोणत्याही प्रकारचे चुकीचे अहवाल देणे, हा न्यायालयाचा अवमान आहे’, असे  न्यायालयाने म्हटले आहे.

मी उपमुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत नाही ! – खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना

सत्तेमधील पदाची मला कुठलीही लालसा नाही. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच मी नेटाने काम करणार आहे. राज्‍यातील सत्तेत कोणत्‍याही मंत्रीपदाच्‍या शर्यतीत मी नाही, असे स्‍पष्‍टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘एक्‍स’ खात्‍याद्वारे दिले आहे.

संपादकीय : सामाजिक माध्यमांना पायबंद हवा ! 

सामाजिक माध्यमांद्वारे युवापिढीला बिघडवणार्‍या माध्यमांच्या विरोधात सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !

Arun Govil On Obscenity In OTT : ‘ओटीटी’वरील अश्‍लीलतमुळे भारतीय संस्‍कृतीची अतोनात हानी !

सरकारकडून यासंदर्भात ठोस कारवाई झालेली पहावयास मिळत नाही. संस्‍कृतीरक्षण, तसेच समाजमन सक्षम ठेवणे, याला सरकारने प्राधान्‍य द्यावे, असेच जनतेला वाटते !

Shahbaz Sharif Congratulated Trump On ‘X’ : पाकमध्ये ‘एक्स’वर बंदी असतांना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वरून ट्रम्प यांचे केले अभिनंदन !

शाहबाज यांच्याकडूनच बंदीचे उल्लंघन करून ट्रम्प यांचे अभिनंदन केल्यावर त्यांच्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून टीका करण्यासह कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे.

Maldives Recalls Diplomat : मालदीवने पाकमधून त्याच्या उच्चायुक्तांना माघारी बोलावले !

मालदीवने पाकमधील त्याचे उच्चायुक्त महंमद तोहा यांना माघारी बोलावले आहे. त्यांनी १ नोव्हेंबरला मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अनुमती न घेता इस्लामाबादमध्ये तालिबानी मुत्सद्दी सरदार अहमद साकिब याची भेट घेतली होती.

संपादकीय : हलाल लादणार्‍यांना ‘जय श्रीराम’; मात्र नको !

दान हे धर्म पाहून दिले जाऊ नये; हे जरी मानवतेला धरून असले, तरी दान हे सत्पात्री असावे, हेही तितकेच खरे आहे. मुसलमानांनी हिंदूंना ‘वैविध्यपूर्ण’ जिहाद आणि आतंकवाद आदी सर्व माध्यमांतून जेरीस आणायचे आणि हिंदूंकडून मानवतावादाची अपेक्षा करायची, हे कसे शक्य आहे ?

‘माझिया मराठीचे नगरी…’

आज आपण हिंदी, इंग्रजी, मराठी अशी काही तरी मिश्र भाषा बोलतो आणि त्या सगळ्या गोंधळात आपण मराठीचे शब्द विसरत आहोत. इतकी कोशसंपदा आहे, एवढे सगळे असतांना हा दृष्टीकोन पालटायला हवा. जोपर्यंत भाषेत चैतन्य येणार नाही, तोपर्यंत भाषेचे हे सगळे प्रकार होत रहाणार.

Russia Fines Google : रशियामध्ये यू ट्यूब चॅनल्स बंद केल्यावरून गूगलला अडीच डेसिलियन डॉलर्सचा दंड !

गेल्या १० वर्षांत वेगवेगळ्या देशांनी गूगलवर एकूण १४ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. २१ ऑक्टोबर २०२२ या दिवशी भारताने गूगलला अनुचित व्यवसायाच्या प्रकरणी १ सहस्र ३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक आणि सामाजिक माध्यमांतील राजकीय विज्ञापने प्रामाणित करून घेणे अनिवार्य !

यामध्ये दूरचित्रवाहिन्या, रेडिओ, चित्रपटगृहे, ई-वृत्तपत्रे आणि इतर डिजिटल माध्यमे अशा विविध माध्यमांसाठी  द्यावयाच्या विज्ञापनांचा समावेश आहे.