इसिसच्या नव्या प्रमुखास जिवे मारल्याचा अमेरिकेचा दावा

इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल्-बगदादी याला ठार केल्यानंतर त्याची जागा घेणार्‍या दुसर्‍या आतंकवाद्यालाही ठार केले आहे. बहुधा त्यानेच इसिसचे प्रमुख पद घेतलेे असावे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली.

अमेरिकेच्या कारवाईत ‘इस्लामिक स्टेट’चा प्रमुख बगदादी ठार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्‍या ‘इसिस’ या क्रूर आतंकवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल्-बगदादी याला अमेरिकेच्या सैन्याने ठार केले आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केला आहे.