जळगाव येथे मद्याचे घोट घेणारा राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र दहिवडे निलंबित

अवैध मद्यविक्रीवर बंदी घालणे हे राज्य उत्पादन विभागातील निरीक्षकांचे काम असतांना स्वतः मद्य पिणारे असे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करण्याच्या पात्रतेचे आहेत का ? अशा कर्मचार्‍यांना नुसते निलंबित न करता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणे आवश्यक आहे.

रावेर (जळगाव) येथे ४१ गायी घेऊन जाणारा कंटेनर पकडला : ६ गायी मृत

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात एका कंटेनरमधून निर्दयीपणे गायींची वाहतूक होत असल्याची माहिती जिल्ह्यातील रावेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या कंटेनरचा पाठलाग करत त्यास विवरा गावाजवळ पकडले.

अवाजवी उपचार शुल्क आकारणार्‍या रुग्णालयांवर कारवाई होणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री  

रुग्णांच्या उपचारात दायित्वशून्यता करणार्‍या डॉक्टरांची गय केली जाणार नाही, तसेच अवाजवी शुल्क आकारणी करणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करा, असे आदेशही देण्यात आले आहेत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

नांदेड येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणार्‍या युवकाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जिल्ह्यातील मुखेड या गावी एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना एप्रिल २०१८ या दिवशी घडली होती. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी संतोष उपाख्य बंटी घोगरे याच्याविरुद्ध ‘पोस्को’ कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीत प्रत्येकी ५ सहस्र रुपये जमा न केल्यास जामीन रहित

‘मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये प्रत्येकी ५ सहस्र रुपये जमा करा, अन्यथा जामीन रहित करण्यात येईल’, अशी शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने दळणवळण बंदीच्या कालावधीत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या ४ आरोपींना सुनावली आहे.

घरीच अलगीकरण करण्यात आलेल्यांनी बाहेर पडल्यास त्यांना ३ मासांच्या कारावासाची शिक्षा होणार

येथील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या घरांवर लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येत असून त्याद्वारे सतर्क रहाण्याचा संदेश दिला जात आहे.

ठाण्यात मद्याच्या दुकानात दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधाला ३ वर्षांनंतर शिक्षा

येथील कॅसल मिल नाका येथील मद्याच्या दुकानात दुसर्‍या ग्राहकाने दिलेले अकराशे रुपये स्वतःचे असल्याचे सांगून आणि चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार २२ जुलै २०१६ या दिवशी घडला होता.