जयपूर येथे धर्मांध पतीकडून हिंदु पत्नीची हत्या

येथे नैना उपाख्य रेश्मा मंगलानी या हिंदु महिलेची तिचा पती अय्याज अहमद याने हत्या केली. रेश्मा सतत भ्रमणभाषद्वारे सामाजिक माध्यमांवर व्यस्त असल्याने तिच्या चारित्र्यावर संशय येऊन अय्याज याने तिची हत्या केल्याचा दावा केला आहे.

(म्हणे) ‘लिट्टे समवेतच्या गृहयुद्धात बेपत्ता झालेल्या तमिळींचा मृत्यू झाला आहे !’

‘मृत्यू झाला’ म्हणजेच श्रीलंकेच्या सैनिकांनी त्यांना ठार करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली, हे सत्य आहेे; मात्र राजपक्षे त्याविषयी काहीही न बोलून बरेच काही सांगत आहेत, हे न कळायला हिंदू दूधखुळे नाहीत ! तेथील हिंदूंवरील संकट अजूनही टळलेले नाही. असे उद्दाम वक्तव्य करणारे राजपक्षे यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार का ?

विक्रम भावे यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले विक्रम भावे यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जानेवारी या दिवशी होणार आहे.

श्रीलंकेने तमिळी हिंदूंचा केलेला नरसंहार जाणा !

श्रीलंकेतील लिट्टेसमवेत झालेल्या गृहयुद्धाच्या वेळी बेपत्ता झालेल्या ३० सहस्र तमिळींचा मृत्यू झाला, अशी घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी केली आहे. ‘बेपत्ता झालेल्यांची हत्या करण्यात आली’, असा आरोप तेथील हिंदूंनी केला आहे.

लिट्टे के साथ हुए गृहयुद्ध में लापता ३० हजार तमिल हिन्दुओ की मृत्यु हुई है ! – श्रीलंका के राष्ट्रपति राजपक्षे

श्रीलंका ने नरसंहार किया है !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या

दोषी राजू मिर्झा याला ४ मासांत न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली : न्यायाविषयीची अशी गतीमानता सर्वच ठिकाणी दिसली पाहिजे !

धर्मांधांनी केलेल्या मारहाणीत पीडित मुलीची आई ठार

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी जामिनावर सुटलेल्या धर्मांधांचे क्रौर्य ! गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा मिळत नसल्याने ते पुनःपुन्हा अधिक आणि मोठे गुन्हे करतात, हेच यातून लक्षात येते !

चित्रकूट (मध्यप्रदेश) येथे बालाजी मंदिराच्या महंतांची गोळी झाडून हत्या 

चित्रकूट जिल्ह्यातील कर्वी कोतवाली या भागातील प्राचीन बालाजी मंदिराचे महंत अर्जुन दास यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. यात त्यांचे शिष्य आशीष तिवारी हे घायाळ झाले.

वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगलीच्या वेळी पोलीस आणि तत्कालीन काँग्रेस सरकार निष्क्रीय राहिले ! – न्या. एस्.एन्. धिंग्रा समितीच्या अहवालात ताशेरे

‘मोठे वृक्ष कोसळल्यावर धरणीकंप होतोच’, असे तत्कालीन काँग्रेस सरकारचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी दंगलीवरून विधान केले होते. त्यावरून हा ‘धरणीकंप’ काँग्रेसप्रणीत होता, हे स्पष्ट होते. वर्ष १९८४ मध्ये झालेल्या दंगलींचा अहवाल ३६ वर्षांनंतर मिळत असेल, तर संबंधितांवर खटला चालणार कधी आणि संबंधितांवर कारवाई होणार कधी ?

मऊ (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या नेत्याची हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! यापूर्वीच वर्ष २०१८ मध्ये देशातील सर्वाधिक हत्यांच्या घटना उत्तरप्रदेशात घडल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यात काही सुधारणा झाल्याचे या घटनेवरून तरी दिसत नाही !