जिहादी आतंकवादी हाफीज सईद याला आणखी १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हाफीज सईद याला यापूर्वीही शिक्षा झाली आहे; मात्र तो घरातच सर्व सुखे उपभोगत आहे. त्यामुळे त्याला अशा कितीही शिक्षा झाल्या तरी त्याच्यावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही . अशी शिक्षा म्हणजे पाकची जगाच्या डोळ्यातील धूळफेक आहे, हेच सत्य आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मुंबईवरील २६ / ११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याला पाकच्या आतंकवादविरोधी न्यायालयाने आतंकवादाला आर्थिक साहाय्य केल्याच्या एका प्रकरणात १५ वर्षांच्या कारावासाची आणि २ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सईद याला यापूर्वीही अशाच ४ प्रकरणांमध्ये २१ वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे त्याला एकूण ३६ वर्षांच्या सामूहिक कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.