सोलापूर येथील सिद्धराम पाटील यांना ‘आद्य पत्रकार देवर्षि नारद पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान

विश्‍व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या ‘आद्य पत्रकार देवर्षि नारद पत्रकारिता’ पुरस्काराचे वितरण भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी माकपच्या हिंदु धर्मीय नेत्याच्या मुलाला इस्लाम स्वीकारण्याचा धर्मांध पत्रकाराचा सल्ला !

इस्लाममध्ये ४ विवाहाला संमती असतांनाही अनेक धर्मांध बलात्कार करतात.  ‘त्यामागे कोणते कारण असते’, हे हा पत्रकार सांगील का ? उद्या ‘बलात्कार करा आणि इस्लाम स्वीकारा’, अशी नवी टूम निघाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! पोलिसांनी असा सल्ला देणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

तुम्ही पाकिस्तान आणि सिरीया येथे राहू इच्छिता का ?

‘भारतात मुसलमान भीतीच्या छायेखाली वावरत आहेत’, असे चित्र निर्माण करू पहाणार्‍या मुसलमान महिला पत्रकाराला काँग्रेसचे माजी नेते आरिफ महमंद खान यांचा सडेतोड प्रतिवाद ! कोणत्याही इस्लामी देशांपेक्षा भारतातील मुसलमानांची स्थिती किती चांगली आहे, हे यावरून लक्षात येते !

पत्रकाराचे समर्थन करता येत नसले, तरी अटक चुकीची असल्याने त्याची तात्काळ सुटका करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला आदेश

सामाजिक माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्यामुळे पत्रकाराला अटक : अनेकदा हिंदुत्वनिष्ठांना अशा प्रकारच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली आहे; मात्र त्यांची कधी सुटका करण्याचा आदेश देण्यात आला, असे ऐकीवात नाही !

घरकुल घोटाळ्याचे वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षकांची अरेरावी !

सत्र न्यायालयात घरकुल घोटाळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आत जाण्यास अटकाव करून अरेरावी करणारे पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक विश्‍वासराव पांढरे यांना देण्यात आले.

शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याकडून पत्रकाराला मारहाण

पत्रकारांना एखाद्या गावगुंडाप्रमाणे मारहाण करणारे असे उद्दाम लोकप्रतिनिधी आणि मारहाण होत असतांना बघ्याची भूमिका घेणारे पोलीस देणारी निरर्थक लोकशाही आता पुरे !

बालाकोटवरील कारवाईत १७० आतंकवादी ठार ! – इटलीच्या महिला पत्रकाराचा दावा

असे कितीही पुरावे दिले, तरी पाक त्याला भीक घालणार नाही. त्यामुळे ‘आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना’ असलेल्या पाकचा निःपात करणे, हाच एकमेव उपाय होय !

श्रीलंकेत ख्रिस्त्यांकडून मुसलमानांवर आक्रमणे होत आहेत ! – न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

भारतात ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया होत आहेत, म्यानमारमध्ये बौद्ध आणि श्रीलंकेत ख्रिस्ती हे त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात, तर भारतात हिंदू मार खात रहातात !

पत्रकार आणि माहिती विभाग यांच्यातील नाते वृद्धींगत व्हावे ! – स.रा. माने, माहिती अधिकारी

प्रसारमाध्यमे आणि माहिती विभाग हे  वेगळे घटक नसून त्या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. पत्रकार आणि माहिती विभाग यांच्यात अतूट नाते असून यापुढील काळात हे नाते असेच वृद्धींगत व्हावे, असे मत जिल्हा माहिती अधिकारी श्री. स.रा. माने यांनी व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF