महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक बंदीवान !
कोरोनाच्या दुसर्या लाटेत एकीकडे संक्रमित रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील एकूण कारागृहामध्ये कोरोनाबाधित बंदीवानांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यातील सर्व कारागृहांत २३ सहस्र २१७ बंदीवानांची क्षमता असतांना तेथे ३४ सहस्र ३२० बंदीवानांना ठेवण्यात आले आहे.