पाक इस्लामी देश असतांनाही तेथे अशांना शरीयतनुसार शिक्षा देत नाहीत, हे लक्षात घ्या ! केवळ सोयीपुरती शरीयतची मागणी केली जाते. यातून धर्मांधांचे ढोंगी धर्मप्रेम उघड होते !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये गेल्या ६ वर्षांत बलात्काराचे २२ सहस्रांहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले; मात्र यांतील केवळ ७७ आरोपींना दोषी ठरवून शिक्षा करण्यात आली. ही टक्केवारी केवळ ०.३ इतकी आहे. पाकमध्ये प्रतिदिन बलात्काराच्या ११ घटना घडत आहेत. ही आकडेवारी पोलीस, कायदा आणि विधी विभाग, मानवाधिकार आयोग, महिला फाऊंडेशन आदींकडून मिळालेली आहे.
पाकिस्तान में हर घंटे 11 रेप की घटनाएं घटती हैं. यह भी बताया जाता है कि यहां बहुत सारी रेप की घटनाएं दर्ज नहीं की जाती हैं.https://t.co/tH9UiWfZFf
— @HindiNews18 (@HindiNews18) December 28, 2020
पाकमध्ये गेल्या ६ वर्षांत बलात्काराचे ६० सहस्रांहून अधिक गुन्हे झाले असण्याची शक्यता आहे; मात्र दबावापोटी त्यांची तक्रार करण्यात आलेली नाही. यातही बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा या भागात अशा घटना अधिक प्रमाणात घडल्या आहेत. नुकतेच पाकने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदाही केला आहे. त्यानुसार दोषीला नपुंसक करण्यात येणार आहे.