दळणवळण बंदी नंतर स्वामींच्या दर्शनाने समाधान लाभले ! – विजयसिंह मोहिते पाटील

कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडल्याने अत्यंत समाधान लाभले आहे.- विजयसिंह मोहिते-पाटील

कास पठार (जिल्हा सातारा) येथील श्री घाटाई देवी मंदिर परिसरात मद्य-मांसाच्या मेजवाण्या !

तिर्थक्षेत्र परिसरातील हे ओपन बार थांबवणार कोण ? असा प्रश्‍न भाविकांकडून उपस्थित होत आहे.

सिंगापूर येथील प्राचीन मंदिरातील पुजार्‍याकडून मंदिरातील दागिने गहाण ठेवत मिळालेल्या पैशाचा अपहार

श्री मरिअम्मन या प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी कंदसामी सेनापती यांनी मंदिरातील मौल्यवान दागिने परस्पर गहाण ठेवत मिळालेल्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

जत (जिल्हा सांगली) येथील गुड्डापूरच्या श्री दान्नमादेवी देवस्थानच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

स्थानिक न्यायालयाने ही तक्रार प्रविष्ट करून घेत जत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद करून चौकशी करावी, असा आदेश दिला आहे.

३१ वर्षांनंतर उघडण्यात आले श्रीनगरमधील शीतलनाथ मंदिर !

जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.

महेश इंगळे यांचे कार्य कौतुकास्पद ! – नरेंद्र पाटील

श्री वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे आध्यात्मिक सेवेचा वसा लाभलेले व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वामी सेवेची संधी लाभली आहे. स्वामी सेवेच्या माध्यमातून महेश इंगळे करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे नरेंद्र पाटील म्हणाले.

राजकारण्यांना वगळून शांततापूर्ण, कायदेशीर आणि सर्वसमावेशक धर्मचळवळ प्रारंभ करण्याचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

राज्यातील आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाला शासन चालना देणार ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (पुणे) तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २८ कोटी ४८ लाख रुपये निधीचे वितरण होणार !

आर्थिक अपव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करावा !

आर्थिक अपव्यवहार झाला असेल, तर संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राशी निगडित विषयांत माननीय न्यायालयाने शंकराचार्य किंवा हिंदूंचे धर्मगुरु यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.