श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !
श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.