हरमल टेकडीवर श्री परशुरामाचा पुतळा उभारा ! – संजय हरमलकर, प्रख्यात चित्रकार, गोवा

परशुराम टेकडीवर भगवान परशुराम यांच्या खुणा अद्याप जिवंत आहेत. इथे भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारावा. भगवान परशुराम यांची चित्रे रेखाटावीत. यामुळे पर्यटनाला वाव मिळण्यासमवेतच स्थानिकांना रोजगार मिळू शकेल.

वीर सावरकर उवाच !

अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारतविजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते.

नव्या संसद भवनातील ‘अखंड भारत’च्या मानचित्राचे भारतियांकडून स्वागत !

अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.

सप्तबंदीचे म्युरल आणि रत्नागिरीचा इतिहास लिहिला जातोय ! – अधिवक्ता बाबा परुळेकर

सावरकर म्हणाले होते,  ‘कितीही संकटे येऊ देत, जोपर्यंत बुद्धी, वाणी आणि लेखणी या गोष्टी माझ्यापाशी आहेत, तोपर्यंत कुणीही मला भारतमातेला मुक्त करण्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाहीत.’

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल  ! – मंत्री मंगलप्रभात लोढा

देशाच्या संरक्षणासाठी सावरकरांनी योगदान दिले. त्यांनी परदेशांतून पिस्तुले पाठवली. त्यातील एक पिस्तूल हुतात्मा कान्हेरे यांना मिळाले. त्यांनी जॅक्सनचा वध केला. त्याचा शोध घेतांना सावरकांनी हे पिस्तूल पाठवल्याचे लक्षात आले.

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही.

मांद्रे, पेडणे येथे ‘धनुष्य आणि बाण’ यांची भव्य प्रतिकृती उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा

गोव्यात काणकोण येथे श्री परशुराम मंदिर सोडल्यास अन्य कुठेही भगवान परशुराम यांच्याशी निगडित वास्तू नाही. यामुळे आम्ही भगवान परशुराम यांचे प्रतीक असलेले ‘धनुष्य आणि बाण’ यांची प्रतिकृती उभारणार आहोत.

सावरकर स्मृती पुरस्कार माझा नसून रत्नागिरीकरांचा ! – अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर  

स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार होते, समाजातील दोष दूर करणारे सुधारक होते, जातीभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणे, हे तीर्थयात्रेसारखे आहे.

गोवा : पोतुर्गालहून कागदपत्रे आणण्याचे सरकारचे नियोजन स्थगित

सरकारने ही कागदपत्रे लवकरात लवकर गोव्यात आणून सार्वजनिक केल्यास त्यातून वस्तूस्थिती गोमंतकीय जनतेसमोर येईल.

राणा प्रतापसिंहाचा जन्म !

प्रताप खरे योद्धे होते. त्यांच्या शौर्याची वाहवा प्रत्यक्ष शत्रूही करत. त्यांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वकुळ यासंबंधीचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी अन् प्रखर होता. अकबराशी युद्ध करण्यात दाखवलेले शौर्य अलौकिक होते.