‘हाउसी’चे आयोजन केल्यास कडक कारवाई ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस् यांनी ‘हाउसी’ या खेळावर दक्षिण गोव्यात बंदी घातली आहे. यावर भाष्य करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ‘हाउसी’च्या विरोधात कडक कारवाई केली जाईल’, असे म्हटले आहे.

१०० कोटी रुपयांचा ‘शेअर मार्केट’ घोटाळा : आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे गोवा सरकारचे आदेश

गोव्यातील फातोर्डा येथील १०० कोटी रुपयांच्या ‘शेअर मार्केट’ (समभाग बाजार) घोटाळ्याच्या प्रकरणी गोवा सरकारने आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

राजश्री शाहू उद्यानातील काम निकृष्ट दर्जाचे असल्याने महापालिकेकडून २ अभियंत्यांची चौकशी !

भ्रष्टाचार करण्याची सवय लागलेल्या अधिकार्‍यांकडूनच कामाचे सर्व पैसे वसूल करायला हवेत. अशांना भर चौकात उभे करून कठोर शिक्षा द्यायला हवी !

सरकारने विनामूल्य योजना बंद कराव्यात ! – भाजप आमदार सुरेश धस

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?

पुणे येथील पदपथ मोकळे ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे महापालिकेला आदेश !

सामाजिक कार्यकर्त्या कनीझ सुखरानी यांनी शहरातील पदपथांच्या दुरवस्थेविषयी जनहित याचिका प्रविष्ट केली होती !

खडवली (कल्याण) येथील वसतीगृहात २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार !

या वसतीगृहात १२ ते १५ मुले रहातात. निराधार मुलांवर अत्याचार करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जलसंपदा विभागाला देण्यात येणार्‍या देयकामध्ये ५ वर्षांत चौपट वाढ !

गेल्या ५ वर्षांत नागरिकांची पाण्याची मागणी वाढत आहे व यामुळे ठरवून दिलेल्या संमत कोट्यापेक्षा जादा पाणी घेतल्याने जलसंपदा विभाग जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशाने महापालिकेकडून पाण्यासाठी अधिकचा दर घेते.

जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांची हत्या करण्याची धमकी; गुन्हा नोंद

जळगाव जिल्हाधिकार्‍यांसह विविध पोलीस अधिकार्‍यांना जिवे मारण्याविषयी ३- ४ वेळा धमकीचे मेल मिळाले आहेत; पण त्यांतील भाषा बघता त्यात विशेष गांभीर्य दिसून येत नाही; मात्र तरीही या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Khalid Hanafi On Non-Muslims : (म्हणे) ‘हिंदु आणि शीख यांच्यासह मुसलमानेतर हे प्राण्यांपेक्षा वाईट !’ – तालिबानी मंत्री

तालिबान्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? भारतात मुसलमानांवर कथित आक्रमण होण्यावरून टीका करणारी इस्लामी देशांच्या संघटना यावर मौन बाळगून का आहेत ?

ठाणे येथे १७ एप्रिलला ‘पितांबरी उद्योग समूहा’चे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार !

विविध संस्था आणि हितचिंतक यांच्या ‘नागरी अभिवादन सत्कार समिती’च्या माध्यमातून १७ एप्रिल या दिवशी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.