सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार

वर्ष २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतील १५० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.या प्रकरणी प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यासह ९ जणांचा आरोपी म्हणून उल्लेख होता.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र अटकेची नोटीस !

नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यावर करण्यात आला आहे. याविषयी जरांगेसह अन्य २ व्यक्तींवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गर्भवतीवर रुग्णवाहिकेतच प्रसूतीची वेळ !

रुग्णवाहिका १५ दिवसांत दुरुस्त का झाली नाही ? किंवा तिला पर्यायी व्यवस्था का दिली गेली नाही ? यासाठी उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

पिंपरीतील (पुणे) २ अनधिकृत शाळांवर गुन्हा नोंद !

लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल’चे श्रेयकुमार यांच्या विरोधात, तर ‘ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल’चे जे. डीकोस्टा आणि समीर गोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

३३ कोटी वृक्षलागवडीच्या प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ (निर्दाेष) !

चौकशी समितीने अहवाल सादर केला असून या मोहिमेमध्ये कुठलीही अनियमितता किंवा अपहार नसल्याचे म्हटले आहे, तसेच ही मोहीम यशस्वी झाल्याचेही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

कवी नारायण सुर्वे यांच्या घरी चोरलेला माल परत करून चोराची क्षमायाचना !

जेव्हा चोराला समजले की, हे कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे, तेव्हा त्याने चोरलेली वस्तू परत ठेवून क्षमायाचना करणारी चिठ्ठी तिथे लिहून ठेवली.

कंत्राटदारांची अडवणूक न थांबवल्यास न्यायालयात जाणार !

‘पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन’ आणि पुणे जिल्हा कंत्राटदार महासंघाची चेतावणी !

श्री विठ्ठलाच्या दर्शनरांगेत सुरक्षारक्षकाकडून भाविकाला धक्काबुक्की !

मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्यात तक्रारी होत असल्याचे प्रकार घडत आहेत

कांदा खरेदीमध्ये अपव्यवहार झाल्याचे उघड !

नाफेड आणि एन्.सी.सी.एफ्.कडून होणार्‍या कांदा खरेदीच्या अपव्यवहाराचा आरोप असलेल्या २ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कॅनडाच्या पारपत्राचे आमीष दाखवून फसवणूक !; लोकलसमोर उडी मारून वडील-मुलाची आत्महत्या !…

९ जुलैला सकाळी भाईंदर रेल्वेस्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणार्‍या लोकलसमोर उडी मारून वडील हरिश मेहता आणि मुलगा जय मेहता यांनी आत्महत्या केली.