मंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्वर
‘ज्या मंदिरांमध्ये अधिक प्रमाणात अर्पण येत आहे, अशीच मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. मंदिरांतून संतांना हटवून तेथे सरकारी अधिकारी आणले जात आहेत. आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे.