धुळे येथील उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता !

येथे ११ आणि १२ जानेवारी असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता झाली. अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक येथील विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, मंदिरांचे विश्‍वस्त, कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

सद्य:स्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती अवलंबणे आवश्यक !

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अद्भुत पराक्रम करून आदिलशाह, कुतुबशाह आणि मोगल यांना जेरीस आणून स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांच्या पराक्रम गाथेतील एक सुवर्णपान म्हणजे, मध्यरात्री बारानंतर महाराजांनी शाहिस्तेखानावर घातलेला छापा !