तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी न्यायक्षेत्रात केलेला हस्तक्षेप आणि शंकराचार्य श्री केशवानंद भारती यांचे न्यायसंस्थेचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यातील योगदान !

‘घटनादुरुस्ती’ म्हटले की, ५० वार्षांपुर्वी न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून अध्यात्मातील एक उच्च व्यक्ती न्यायक्षेत्रालाही संस्मरणीय कशी ठरली याचे हे उदाहरण आठवतेच !

विदर्भातील मंदिरांचे विश्‍वस्त आणि पुरोहित यांचा मंदिर रक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

मंदिर संस्कृतीचे रक्षण व्हावे, मंदिरांवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात हिंदूंचे संघटन व्हावे, रूढी-परंपरा जपल्या जाव्यात आणि सर्व मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ बैठक घेण्यात आली.

तत्कालीन मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर अखेर गुन्हा नोंद

श्री तुळजाभवानी मंदिरातील जमादार खान्यातील देवीच्या खजिन्यात ठेवलेले अतीप्राचीन देवीचे अलंकार, वस्तू, दुर्मिळ ७१ नाणी गहाळ केल्याच्या प्रकरणी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

श्री तुळजाभवानी देवस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीच विविध राजे-रजवाड्यांकडून मंदिराला दिलेली ७१ पुरातन दुर्मिळ नाणी, देवीच्या अंगावरील दागिने, मौल्यवान माणिक आणि चांदी यांच्या २ खडावा गहाळ केल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता.

मंदिरभूमींचे ‘धर्मांतर’!

सनातन हिंदु धर्म आणि मंदिर संस्कृती हा आध्यात्मिकतेचा गाभा आहे. पूर्वीच्या काळी परकीय आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त करून देवतांच्या मूर्तींची विटंबना केली, तर आज ‘सेक्युलर’वादाची झूल पांघरलेली सरकारे मंदिरांच्या संपत्तीची लूटमार करत आहेत.

राज्यघटनेचे संरक्षक शंकराचार्य !

सध्याचे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, साम्यवादी जे स्वतःला देशाच्या लोकशाहीचे, राज्यघटनेचे खरे संरक्षक, ठेकेदार समजतात त्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावणारे केरळमधील इडनीर मठाचे शंकराचार्य केशवानंद भारती यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्याविषयी माहिती आज पुन्हा देशासमोर येत आहे.

टाटा, अंबानी आदी उद्योगपतींपेक्षा अधिक उत्पन्न असणारे सायरो मलबार चर्च कर भरत नाही !

केरळमधील सायरो मलबार चर्चकडे ३ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. भारतच नाही, तर जगातील सर्वच कॅथलिक चर्चमध्ये सायरो मलबार चर्चची संपत्ती सर्वाधिक आहे. देशातील हिंदूंची मोठमोठी मंदिरे कह्यात घेणारे सरकार या चर्चचे सरकारीकरण करण्याचे धाडस का दाखवत नाही ?

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंदिरांचे सोने घेण्याच्या मागणीस धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटरवरून विरोध

त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी   #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.